अनिकेत आमटे यांना समाजसेवा पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

गडचिरोली : आदिवासी बांधवांच्या सेवेत कार्यरत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक तथा समाजसेवक अनिकेत प्रकाश आमटे यांना जीएस महानगर को-ऑप. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

अनिकेत आमटे यांना हा पुरस्कार 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्‍यातील पिंप्री जळसेन येथील ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयात पार पडणार आहे. आदिवासी आरोग्य व जनजीवनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांचे समाजकार्य अनिकेत आमटे पुढे नेत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आदिवासींसाठी अनिकेत आमटे शिक्षण, आरोग्यासह जलसिंचन व रोजगारविषयी कार्य करून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aniket Amte Announces Social Service Award