Election Results 2019 : अनिल देशमुखांची विजयाकडे वाटचाल 16 हजारांवर मतांची आघाडी 

file photo
file photo

नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख विजयाकडे वाटचाल करीत असून पंधराव्या फेरीअखेर निर्णायक 16 हजार 76 मतांची आघाडी घेतली आहे. देशमुख यांचा करिश्‍मा मतदारसंघात कायम असल्याचा हा निकाल आहे. अनिल देशमुख यांना 80 हजार 509 मते मिळाली आहेत. 
देशमुखांचे समर्थक फटाके फोडून आंनद साजार करीत आहेत. मिठाईचे वाटप करण्यात आले आहे, समर्थकांनी अनिल देसमुखांसह विजयी रॅली काढली आहे. यावेळी देशमुख त्यांच्या मूळ गावी वडविहिरा येथे असून तेथे समर्थकांची गर्दी झाली आहे. 
सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते काटोलमधून देशमुखांचा करिश्‍मा कमी करू शकले नाहीत. मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी देशमुखांनी पूर्ण तयारी केली होती हे विशेष. मागील पाच वर्षांत परायजनंतरही लोकांसाठी लढा उभारणारे अनिल देशमुख यांच्या वाड्यावर गर्दी वाढतच होती. याचमुळे त्यांना यावेळी विजयाची संधी असल्याचे वाटत आहे. अनिल देशमुखांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आल्यानेही त्याचाही प्रभाव मतदारांवर राहणार आहे. पूर्ण देशमुख कुटुंबीय प्रचारात उतरले होते.शेतकरीपुत्र व शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता ही प्रतिमा त्यांनी मागील पाच वर्षांत कायम राखली आहे. येत्या काळात देशमुखांची मतदारसंघावरील पकड आणखी घट्ट होणार आहे. 
भाजपच्या पराभवानंतर पुन्हा एकदा भाजपसमोर नेतृत्त्वाचा प्रश्‍न उभा राहण्याची शक्‍यता आतापासून दिसू लागली आहे. बावनकुळे यांना नाकारलेल्या उमेदवारीचा फटका येथेही दिसला असून तेली मते अनिल देशमुखांच्या बाजूने वळल्याने त्यांचा आघाडीत मोठी वाढ झाली. नागपूर जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपला साथ दिली नसल्याची चर्चा रंगली आहे. भाजपला काटोलमध्ये पुन्हा जागा मिळविण्यासाठी चांगलाच जोर लावावा लागणार आहे. हे निश्‍चित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com