अनिल किलोर व अविनाश घरोटे यांनी घेतली शपथ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरातील ऍड. अनिल किलोर व ऍड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदाची शुक्रवारी राज्याचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. मुंबई येथे पार पडलेला हा शपथविधी सोहळा नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात लाइव्ह बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सोहळा पाहण्यासाठी न्यायमूर्ती किलोर यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. यामध्ये, नानासाहेब किलोर (काका), रत्ना किलोर आणि सुनंदा किलोर (काकू), प्रभाकर, प्रवीण, योगेश, गौरव (भाऊ) सहभागी झाले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती झेड. ए. हक, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती विनय देशपांडे, न्यायमूर्ती स्वप्ना जोशी, न्यायमूर्ती रोहित देव, न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला, सरकारी वकील ऍड. सुमंत देवपुजारी, अतिरिक्त सॉलिसटर जनरल उल्हास औरंगाबादकर, व्यवस्थापक (प्रशासन) अतुल शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ वकील उपस्थित होते. तसेच, शहरातील अनेक ज्येष्ठ वकील मुंबई येथे प्रत्यक्ष हा सोहळा अनुभवायला गेले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kilor and Avinash Gharote sworn in