रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उच्छाद

राजेश प्रायकर
रविवार, 22 जुलै 2018

नागपूर : राजकीय दडपणामुळे जनावर मालकांना महापालिकेनेच अभय असल्याने रस्त्यांवर जनावरांचा वावर अधिकच वाढला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडल्याने वाहतूक कोंडी होत असून सकाळी कार्यालय तर सायंकाळी घर गाठण्याच्या घाईत असलेले चाकरमाने, कर्मचाऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार आहे. मोकाट जनावरांच्या अडथळ्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचाही जीव धोक्‍यात आला आहे.

शहरात सिमेंट रस्ते, मेट्रो रेल्वे, उड्डाणपूलाच्या कामांमुळे वाहने चालविताना नागरिकांची कसरत होत आहे. त्यात आता मोकाट जनावरांनीही भर घातली. दहीबाजार उड्डाणपूल ते शांतीनगर रोड, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक रस्ता, मेडिकल चौक ते अजनी, रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोड, रिंग रोड, इंदोरा, कामठी रोड, शंकरनगर ते धरमपेठ, रामनगर, फुटाळा तलाव रोड, अमरावती रोड, माटे चौक ते प्रतापनगर, जयताळा रोड, महाल ते इतवारी रोड, टेलिफोन एक्‍सचेंज चौक ते सतरंजीपुरा, ग्रेट नाग रोड या वर्दळीच्या रस्त्यांवर दररोज गाय, म्हशींचे कळप दिसून येत आहे.

Web Title: animals block road and make traffic