कुख्यात अंकित गांजा स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नागपूर : पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत कुख्यात गुंड अंगुलीमालनगर, पाटणकर चौक निवासी अंकित ऊर्फ गांजा जयनाथ चव्हाण (26) वर एमपीडीए लावला आहे. अंकितसह 40 गुन्हेगारांवर आयुक्त उपाध्याय यांनी एमपीडीएची कारवाई करून तुरुंगात रवानगी केली आहे. अंकित 2014 पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, विनयभंग, जबरीने घरात घुसून मारहाण, मुलांचे शोषण यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याचा गुन्ह्यांचा ग्राफ वाढतच होता.

नागपूर : पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत कुख्यात गुंड अंगुलीमालनगर, पाटणकर चौक निवासी अंकित ऊर्फ गांजा जयनाथ चव्हाण (26) वर एमपीडीए लावला आहे. अंकितसह 40 गुन्हेगारांवर आयुक्त उपाध्याय यांनी एमपीडीएची कारवाई करून तुरुंगात रवानगी केली आहे. अंकित 2014 पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, विनयभंग, जबरीने घरात घुसून मारहाण, मुलांचे शोषण यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याचा गुन्ह्यांचा ग्राफ वाढतच होता. गुन्हेगारीत त्याची सक्रियता पाहून परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त यांनी त्याला 2 वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते. तडीपार असतानाही त्याने शहरात 2 गुन्हे केले. अंकितची स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत होती. यामुळे पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात जरीपटकाचे ठाणेदार पराग पोटे यांनी अंकितचा गुन्हेगारी रेकॉर्ड गोळा केला. सहआयुक्त रवींद्र कदम आणि पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात एमपीडीए सेलतर्फे अंकितविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून 7 ऑक्‍टोबरला अंकितवर एमपीडीए लावला. त्याला अटक करून अकोला मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ankit ganja, crime