अंकिता जळीत कांड प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू

आज कामकाजाच्यावेळी न्यायालयीन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता
Ankita pisudde
Ankita pisuddeAnkita pisudde

हिंगणघाट (जि. वर्धा) : राज्यात गाजलेल्या प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणी (Ankita burning scandal) बुधवारी (ता. एक) शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी (hearing start) घेण्यात आली. गुरुवारी (ता. दोन) सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) शहरात दाखल झाले असून, न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता.

ॲड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद सादर केला. गुरवारी पुन्हा प्रक्रिया सुरू राहणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने आपला युक्तिवाद सादर करतील. खटल्याचे कामकाज आता जवळजवळ संपुष्टात आले असून, लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. आज कामकाजाच्यावेळी न्यायालयीन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता.

Ankita pisudde
ओमिक्रॉनच्या एका रुग्णापासून १५ जणांना धोका; काय सांगतात तज्ञ

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यातील दारोडा गावातील रहिवासी असलेली अंकिता पिसुड्डे कॉलेजला जात होती. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एकतर्फी प्रेम करणारा विकेश नगराळे (२७) याने पेट्रोल टाकून जाळले. काही वेळांनी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि इतर युवकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, आठ दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com