नक्षल्यांनी जाळला आणखी एक जेसीबी

मनोहर बोरकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गट्टागुडा गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या निर्माण कामावरील एक जेसीबी मशीनला नक्षल्यांनी भर दिवसा आग लावली असून, कंत्राटदाराचे वीस लाखांचे नुकसान झाले.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गट्टागुडा गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या निर्माण कामावरील एक जेसीबी मशीनला नक्षल्यांनी भर दिवसा आग लावली असून, कंत्राटदाराचे वीस लाखांचे नुकसान झाले.

पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत गट्टा ते गट्टागुडा गावपर्यंत दोन किलोमीटर अंतर रस्ता निर्मितीचे काम गडचिरोलीचे लोकेश डोंगरवार नामक ठेकेदारांकडून केले जात असून, त्यावरील कामावर मुरुम काम सुरु आहे. (ता 21) शुक्रवारला दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान 50 ते 60 च्या संख्येतील शस्त्रसज्य व गणवेशधारी नक्षल्यांकडून घेराव घालून काम बंद करण्यास सांगण्यात आले. तीष्ण हत्याराने जेसीबी वाहनाची डिझेल ट्रंक फोडून वाहनावर डिझेल टाकून आग लावण्यात आली. यावेळी मजूर, वाहक व चालकांना कोणतेही रस्ता निर्माणकार्य करण्यात येऊ नये, अशी धमकी देण्यात आली.

मंगळवारी याच रस्त्यावर क्लेमोर माईन बॉम्बस्फोटकाचा नक्षल्यांनी घात लाऊन ठेवला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बॉम्ब हस्तगत करून निकामी करण्यात आला होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळली गेली. जाळपोळ माओवाद्यांच्या गट्टा एरिया दलम कमिटीने केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.

नक्षल्यांचे जाळपोळ सत्र एक महिनापासून सुरुच

30 नोव्हेंबर रोजी हालेवार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गट्टेपल्ली गाव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सडक योजनेवरील दहा जेसीबी मशीन, पाच जॉइंडर ट्रॅक्टर व एक पिकअप अशा 16 वाहनांची नक्षल्यांनी भरदिवसा जाळपोळ केली होती. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरीपासून 300 मीटर अंतरावर सुरजागड पहाडीवरील लोहखनिज वाहतूक करणारा एक ट्रकला रात्रीच्या वेळी नक्षल्यांनी आग लावली होती. त्यामुळे गेले महिनाभरत नक्षल उद्रेक सतत सुरु असून, नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Web Title: Another JCB burnt by Maoists in Gadchiroli