लाचखोर भूकरमापक गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

भंडारा : भूमिअभिलेख कार्यालय भंडारा येथे कार्यरत भूकरमापक नारायण बलखंडे (वय 45) याला लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. बोरगाव येथील तक्रारकर्त्या व्यक्तीच्या आईचे व मावशीचे नाव शेतजमिनीची मोजणी करून वेगळे करावयाचे होते. यासंदर्भात त्याने भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर भूकरमापक नारायण बलखंडे यांची भेट घेतली. त्याने हे काम करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार आल्यानंतर विभागाने या प्रकरणाची शहानिशा करून सापळा रचला. चार हजारांची लाच स्वीकारताना बलखंडे याला पकडण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anti corruption bureau Squad news

टॅग्स