गडचिरोली जिल्हा बंदचे नक्षल्यांचे जनतेला आवाहन

मनोहर बोरकर
बुधवार, 9 मे 2018

एटापल्ली - तालुका मुख्यालया पासून तीन किलोमीटर अंतरावर सुरजागड रस्त्यावरील तुमरगुंडा गावाजवळ मंगळवारी (ता.8) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नक्षल्यांनी बॅनर लावले व छापिल पत्रके वाटली. यामध्ये दिनांक 22 व 23 एप्रिलला बोरिया व राजाराम खांदला परिसरात मारल्या गेलेल्या माओवाद्यांच्या मृत्यु प्रकरणी गडचिरोली जिल्हा बंद पाळण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

भामरागड तालुक्याच्या सिमेवरिल ताळगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीतिल बोरिया जंगल परिसरात रविवार (ता 22एप्रिल) रोजी सकाळी ११ वाजता पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती. पेरमिली दलम कमांडो तथा माओवादी चळवळीचा विभागीय सदस्य साईनाथ (वय35 वर्ष) व विभागीय सचिव श्रीनूसह (वय 38वर्ष)  चौतीस माओवाद्यांचा गडचिरोली पोलिसांचे C-60 कमांडोनी खात्मा केला होता. तसेच सोमवारी (ता 23 एप्रिल) अहेरी तालुक्यातील राजाराम(खांदला) जंगल परिसरात अहेरी दलम कमांडो नंदू सह सहा माओवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला होता.

जिल्ह्यातील नक्षली इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. उच्च पदस्थ जहाल नक्षली साईनाथ, श्रीनु व नंदूसह चाळीस माओवादी ठार झाल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला असून, माओवाद्यांकडून पत्रकबाजी द्वारे पोलिसांच्या कारवाईचा बदला घेण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे 

पत्रकात जल, जंगल व जामिनीचे रक्षणकर्ते माओवादी श्रीनू, साईनाथ, नंदू, लता, शांता, जमुना, राजेश,माधुरी, कार्तिक, नागेश, लिम्मि, चंद्रकला, श्रीकांत, सुमन, तिरुपति, सन्नू, क्रांति, मुन्नी, जयशिला, अनिता व रेश्मा या बोरिया व राजाराम परिसरात पोलिस-नक्षल चकमकित ठार माओवाद्यांच्या नावाचे उल्लेख करण्यात आले असून भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी असाही उल्लेख केला आहे.

Web Title: Appeal to the people Gadchiroli District Bandh