अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : एका मराठी चित्रपटात अर्ज भरताना उमेदवार चिल्लर पैस अनामत रक्कमसाठी देतो, काही चित्रपटात अर्ज भरण्यासाठी उमेदवारा मोठ्या गाजवाजा करीत येतो. काही लोक विचित्र पेहराव करून येतात. मात्र, एका उमेदवाराने अर्ज दाखल करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायची परवानगी मागितली आहे. हे ऐकून आश्‍चर्य वाटेल, परंतु ही गोष्ट खरी आहे. तसा अर्ज त्याने प्रशासनाकडे केला आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे अद्याप उमेदवार निश्‍चित व्हायचे आहे. असे असले तरी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करूनच उमेदवारी अर्ज दाखल करतील. अनेक समर्थक सोबत असतील. मात्र एकाला उमेदवारी दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरने यायचे आहे. हेलिकॉप्टरने येण्याची परवानगी मागितलेल्या या उमेदवाराला उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरायचा आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी या उमेदवाराला हेलिकॉप्टरने यायचे आहे. इंदोरा चौक येथून हेलिकॉप्टरने दीक्षाभूमीवर पुष्पप्वृष्टी करायची आहे. यानंतर कस्तुरचंद पार्कवर हेलिकॉप्टर उतरवण्याची त्याची इच्छा आहे. यासाठी त्याने रीतसर परवानगी मागितली आहे. यासाठी एनओसी आवश्‍यक असून ते पोलिस, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: application, helicopter