लातुरातील अकरावी प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने घ्या, पालकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

लातूर : शहरातील अनेक महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेत असताना वेगवेगळ्या माध्यमातून पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही लुट थांबण्यासाठी आणि प्रवेशातील पारदर्शकता वाढण्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया पुण्या-मुंबईप्रमाणेच लातूरातही केंद्रीय पध्दतीने घ्या, अशी मागणी विद्यार्थी-पालक मंचाच्या वतीने शिक्षण विभागाकडे गुरूवारी करण्यात आली. या मागणीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दहावीचा निकाल अवघ्या काही दिवसांनी जाहीर होणार आहे. त्याआधीच शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पैसे भरून सिट बुक करा, असे सांगितले जात आहे. निकालानंतर प्रवेश घ्यायचा असेल तर जास्त शुल्क भरावे लागेल, असेही पालकांना सांगितले जात आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी-पालक मंचाने अकरावीचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने घेण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक एस. एम. यादगीर यांना संघटनेतर्फे देण्यात आले.

अकरावी प्रवेशप्रक्रिया सोपी, सुटसुटीत, सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी आणि पारदर्शक होण्यासाठी केंद्रीय व ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागामार्फत सुरु करावी. याबाबत तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी शहरातील सर्व कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्यांची, विद्यार्थी पालक मंचाच्या पदाधिकाऱ्यांची तसेच शहरातील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची व्यापक बैठक घ्यावी. अन्यथा अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अनागोंदी कारभारावर शिक्षण विभागाचा, सरकारचा वचकच राहणार नाही, असेही संघटनेने निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी उदय गवारे, प्रदीपसिंह गंगणे, अंतेश्वर कूदरपाके, ताहेरभाई सौदागर, प्रा. संगमेश्वर पानगावे, प्रदीप पाटील, शेषेराव बिरादार, बालाजी पिंपळे, राजेश खटके, भालचंद कवठेकर, मुन्ना तळेकर, संदीप पाटील, एम. एच. शेख आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: applies centralize method for 11th admissions in latur demanded by parents and students