अर्ज करा आदर्श पुरस्कार मिळवून देतो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : जिल्ह्यातील एका वजनदार नेत्याच्या नातेवाईक असलेल्या शिक्षिकेस आदर्श पुरस्कार देण्यासाठी जिल्हा परिषदेत एका अधिकाऱ्याचा खटाटोप सुरू आहे. याकरिता पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतरही अर्ज करण्यास सांगण्यात आले असून, तो प्रस्ताव मागील तारखेत सादर करण्यात येणार असल्याची चांगलीच चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

शिक्षण विभागातर्फे आदर्श पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्‍यातून शिक्षकांना प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार शिक्षकांनी ते सादरही केले आहेत. 17 ऑगस्ट प्रस्ताव सादर करण्याची शेवटची मुदत होती. जिल्हा परिषदेच्या हिंगणा पंचायत समितीमधून एका ज्येष्ठ शिक्षकाने आदर्श पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. ते ज्येष्ठ आणि पुरस्कारासाठी सक्षम असल्याने या पंचायत समितीमधून दुसऱ्या कुठल्याच शिक्षकांनी आदर्श पुरस्कारावर दावा केला नाही. त्यामुळे त्यांना पुरस्कार जवळपास निश्‍चित झाला आहे. मात्र, तो त्यांना मिळू नये याकरिता आता शिक्षण विभागातर्फे आटापिटा केला जात आहे. एका अधिकाऱ्याने याच पंचायत समितीत कार्यरत असलेल्या शिक्षिकेला अर्ज कारण्यास सांगितले.
तुम्ही फक्त अर्ज करा व त्याकरिता लागणारे आवश्‍यक दस्तावेज सादर करा. पुरस्कार तुम्हालाच देतो अशीही हमी घेतल्याचे कळते. हे सांगताना त्यांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदतही संपल्याचे भान राहिले नाही. पुरस्कार मिळण्याची हमी असल्याने संबंधित शिक्षिकेची सर्व दस्तावेज गोळा करणे सुरू केले आहे. तातडीने पोलिस व्हेरिफेकशनही केले आहे. जिल्ह्यातील एका वजनदार नेत्याने संबंधित शिक्षिकेची शिफारस केली असून त्यानुसार अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करीत असल्याचे बोलले जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apply to earn the ideal award