अमरावतीत होणार आर्चरी ऍकेडमी : किरेन रिजीजू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

अमरावती : पारंपरिक खेळांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. मल्लखांब या क्रीडाप्रकारातील उपक्रमांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. अमरावती येथे धनुर्विद्या क्रीडा विकासाची शक्‍यता लक्षात घेऊन आर्चरी ऍकेडमीसाठी निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज, मंगळवारी दिले. श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात आयोजित अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार नवनीत राणा, खासदार जुगलकिशोर शर्मा, आमदार रवी राणा, संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत चेंडके, सुरेश देशपांडे, सचिव माधुरी चेंडके, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर आदी उपस्थित होते.
अमरावतीत पहिल्यांदा आलो असलो तरी महाराष्ट्राशी माझे जुने नाते आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचा सदस्य म्हणून मी मुंबईत काम केले आहे. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने फेडरेशनची निर्मिती केली आहे. त्यामार्फत मल्लखांब क्रीडाप्रकाराच्या वाढीसाठीही साहाय्य करणार असल्याचे रिजीजू म्हणाले.
अभ्यासाचे ओझे टाकू नका
आजचे विद्यार्थी हे उद्याची पिढी आहे. त्यामुळे बालकांवर केवळ अभ्यासाचे ओझे टाकू नका. त्यांच्या जगण्याची प्राकृतिक लय हरवू देऊ नका. त्यांना खेळू द्या, कणखर होऊ द्या. पुढे ते निश्‍चित आपापल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन करिअर घडवतील. ग्रामीण भागातील मुलांतील गुणवत्तेचा वेध घेतला पाहिजे. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन मोठमोठ्या स्पर्धांत सहभागासाठी प्रोत्साहित करावे. शहरात हॉकी मैदान, सिंथेटिक ट्रॅक आदींसाठी आपण सकारात्मक असल्याचेही किरेन रिजीजू म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: archerry academy to be establish in amravati