विद्यार्थी होणार सुवर्णयुगाचे शिल्पकार - डॉ. वेदप्रकाश मिश्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नागपूर - वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रात प्रवृत्त करण्यासाठी वैद्यकीय शिक्षकांनी काम करावे. वैद्यकीय शिक्षकांच्या अध्यापनातून विद्यार्थी उद्याच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार ठरणार आहेत. विद्यार्थी मोठे झाले तर शिक्षकांचा सन्मान वाढतो, असे मत कराड येथील कृष्णा मेडिकल रिसर्च ॲण्ड सायन्सेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. 

येथील ॲल्युमनी असोसिएशनतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला (मेडिकल) दोन डिजिटल पोडियम भेट देण्यात आले. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ॲल्युमनी असोसिएशनतर्फे डॉ. विक्रम मारवाह आणि डॉ. डी. के. खडासने मेमोरियल डिजिटल पोडियम असे नामकरण करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. जे. सुभेदार, सचिव डॉ. विभावरी दाणी, पद्मश्री डॉ. अशोक  गुप्ता, वैद्यकीय सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सुपरचे  विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. राज गजभिये उपस्थित होते. 

अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी असोसिएशनचे आभार मानले. डॉ. विभावरी दाणी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मीना वाजपेयी यांनी संचालन केले. डॉ. श्रीगिरीवार यांनी आभार मानले.

विकासाच्या दिशेने - डॉ. निसवाडे 
मेडिकल विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संस्थेची गौरवशाली परंपरा होती. परंतु काळाच्या ओघात ती मंदावली. आता मेडिकलजवळ पैसा आहे. या संस्थेला प्रामाणिक प्रयत्नातून पुढे नेण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागावा. शिकवताना वैद्यकीय शिक्षक आता हायटेक होतील. यामुळे विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळणार आहे, असे सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.

Web Title: The architect of the golden age of students