अर्जुन तेंडुलकर नागपुरात खेळणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नागपूर : भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आगामी बापुना चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बघितल्या जाणाऱ्या यंदाच्या बापुना चषक क्रिकेट स्पर्धेत स्थानिक संघांसह मुंबई, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे बाहेरचे तीन संघ सहभागी होणार आहेत. येत्या सहा सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय मुंबई संघ सोमवारी जाहीर करण्यात आला असून, त्यात अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे.

नागपूर : भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आगामी बापुना चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बघितल्या जाणाऱ्या यंदाच्या बापुना चषक क्रिकेट स्पर्धेत स्थानिक संघांसह मुंबई, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे बाहेरचे तीन संघ सहभागी होणार आहेत. येत्या सहा सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय मुंबई संघ सोमवारी जाहीर करण्यात आला असून, त्यात अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी अर्जुनचा खेळ नागपूरकरांना जवळून पाहायला मिळणार आहे. अर्जुन डावखुरा मध्यमगती गोलंदाज असून, 2018 मध्ये भारतीय ज्युनियर संघाकडून खेळला आहे. गतवर्षी नागपुरातील चारदिवसीय सामन्यासाठी 19 वर्षांखालील मुंबई संघात अर्जुनचा समावेश करण्यात आला होता. मात्र, ऐन सामन्यापूर्वी जायबंदी झाल्याने तो खेळू शकला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Tendulkar will play in Nagpur