अडीच हजारांवर थकबाकीदारांना ‘शॉक’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

नागपूर - महावितरणने वीजबिलाची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली. याअंतर्गत जानेवारी महिन्यात आतापर्यंत नागपूर परिमंडळातील तब्बल २ हजार ५५७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. 

महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांच्या आदेशानुसार चालू महिन्याच्या वीजबिलांसह थकबाकीची वसुली करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. 

नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता आर. जी. शेख यांच्या नेतृत्वात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात थकीत वीजबिलाच्या वसुलीची कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली. गत २३ दिवसांमध्ये २ हजार ५५७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यात नागपुरातील १,६७१ तर वर्धा जिल्ह्यातील ८८६ ग्राहकांचा समावेश आहे. 

या ग्राहकांकडे १ कोटी ४४ लाखांची थकबाकी होती. त्यापैकी १ हजार ५२३ ग्राहकांनी १ लाख १८ हजार ९०४ रुपयांचा भरणा केल्याने त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Web Title: arrears customer electricity disconnect

टॅग्स