भिडेंबद्दल हसावं की रडावं हेच कळत नाही: धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

बुलडाणा : आंबे खाल्ल्याने आपत्याप्राप्ती होते असे सांगणाऱ्या संभाजी भिडेंबद्दल हसावं की रडावं हेच कळत नाही. भिडे मनुस्मृतीचे समर्थन करीत सरकारच्या मदतीने राज्यातील पुरोगामीत्व घालविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले.

मुंडे बुलढाणा जिल्ह्यातील दूसरबिड येथील आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना, भीमा कोरेगांव दंगल प्रकारणातील मुख्य आरोपी हे संभाजी भिडे असून, तेच खरे सूत्रधार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल असताना सुद्धा ते खुलेआम फिरत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा असे सुद्धा धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यात डॉ. राजेन्द्र शिंगणे यांच्या नेतृत्वात शिवसेना व रयत क्रांति संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी धनंजय मुंढे यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश घेतला.

यावेळी विचारमंचावरुन बोलताना मुंडे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखविले, यावर कडाडून टिका केली. या मेळाव्याला जिल्हाभरातून हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: arrest sambhaji bhide urgently says dhananjay munde