अकोल्यातील ‘तब्बू’स अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

अल्पवयीन पीडितेला विकण्यास केले होते सहाय्य, खदान पोलिसांची कारवाई.

अकोला : एका 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेस बाहेर राज्यात विकण्याऱ्या टोळीस सहाय्य करणाऱ्या मनिषा उर्फ तब्बू विष्णू तायडे नामक आरोपी महिलेस खदान पोलिसांनी शनिवारी (ता.14) अटक केली आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलींना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, लवकरच ही टोळी खदान पोलिसांच्या जाळ्यात अडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Image may contain: one or more people

खदान पोलिस ठाण्यांतर्गत वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली की, तिची 14 वर्षीय मुलगी ही 26 जानेवारी 2019 रोजी शाळेत प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जाते म्हणून घरातून निघून गेली. त्यानंतर या मुलीचा दामिनी पथकाने शोध घेऊन तिला येथील सुधारगृहातही दाखल केले होते. मात्र, तिथूनही तिने पळ काढला होता. त्यानंतर पुन्हा ती बेपत्ता झाल्याने काही दिवसांपूर्वी खदान पोलिस ठाण्यांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यात ऐवढा उशीर का असेही तक्रारदार महिलेला विचारण्यात आले मात्र, तिने असंख्य उडवा-उडवीचे उत्तरे दिली. मात्र, खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात सदर अल्पवयीन पीडितेस बाहेर राज्यात विकण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या मनिषा उर्फ तब्बू विष्णू तायडे या आरोपी महिलेस अटक केली असून, तिच्याविरुद्ध कलम 363, 366 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या शोधार्थ पथक शेगावला रवाना
अल्पवयीन पीडितेस बाहेर राज्यात विकल्यानंतर ती पीडिता तेथूनही पळून आल्याची माहिती आहे. पीडिता ही बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिसल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांनी या पीडितेच्या शोधार्थ एक पथक शेगावी रवाना केले आहे.

Image may contain: text

तीन संशयीत महिला रडारवर, चार जणांची चौकशी
अल्पवयीन पीडितेस बाहेर राज्यात विकणाऱ्या टोळीस सहाय्य करणाऱ्या ‘तब्बू’ नामक महिलेस खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर तिची चौकशी केली आहे. याप्रकरणी शनिवारी चार संशयीतांची चौकशी केली असून, त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर तीन संशयीत महिलांना ताब्यात घेण्यासाठी एक पथक शहरभर फिरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घरं उदास झाली की, शहरं गुन्हेगारीकडे वळतात
विकण्यात आलेल्या अल्पवयीन पीडितेस बालवयापासूनच नशा करण्याची सवय लागलेली आहे. विशेष म्हणजे पीडिता ज्या कुटुंबात राहते त्या कुटुंबात आई-वडिलांचे पटत नसल्याने ते विभक्त राहतात. या आणि अशा अनेक कारणामुळेच पीडिता नशेच्या आहारी गेली असून, तिचाच फायदा घेत अशा टोळींचे फावले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrest of 'Tabu' in Akola