कासवाची तस्करी करणाऱ्यांना अटक

कासवाची तस्करी करणाऱ्यांना अटक

नागपूर : अग्रसेन चौकातील सेंट्रल एव्हेन्यूवर कासवांची विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दहा कासव ताब्यात घेतले आहे. अग्रसेन चौक सेंट्रल एव्हेन्यूवर कासवांची तस्करी होत असल्याची माहिती पिपल्स फॉर ऍनिमल संस्थेने वन विभागाला दिली. वन विभागाने सापळा रचून शुक्रवारी सकाळी आठ वाजता अग्रसेन चौकातील विक्रेत्यावर छापा टाकला. त्यावेळी ऋषीकेश प्रदीप यादव (20, रा. स्वामी विवेकानंदनगर पीएमसी जवळ कन्हान रोड, पारशिवनी) व आशीष राजेंद्र खोब्रागडे (25, रा. पिंपरी कन्हान) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून अनुसूची एकमध्ये येणारे जिवंत कासव व दुचाकी जप्त केली. न्यायालयाने आरोपींना आठ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारवाई उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, वन परिक्षेत्र अधिकारी विजयकुमार गंगावने, पाटील, चरडे, वाघ, कडवे, अतकुलवार, राघोर्ते, मोहटे, चाफले सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com