पुसद येथे पिस्तुलासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : येथील वसंतनगरात घातपात करण्याच्या उद्देशाने पिस्तुलासह धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या दोन संशयितांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. ही कारवाई यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नीलेश शेळके व त्यांच्या पथकाने आज, गुरुवारी केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राम रहिमनगरातील शेख अख्तर शेख मुख्तार व त्याचा साथीदार मधुकरनगरातील रहिवासी जब्बार खान ऊर्फ काल्या माजित खान पठाण यांचा समावेश आहे. या कारवाईत त्यांच्याकडून एक पिस्तूल, धारदार चाकू, दोन जिवंत काडतुसे, बजाज डिस्कवर मोटरसायकल व दोन मोबाईल असा एकूण 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested two with pistol at Pusad