पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील मोवाडा येथे 33 वर्षीय विवाहित तरुणाचा झोपेत खून करण्याची आल्याची घटना शुक्रवारी (ता.9) सकाळी उघडकीस आली. घाटंजी पोलिसांनी दोन संशयितांना काही तासांतच अटक केली असून, संशयितांमध्ये मृताच्या पत्नीचाही समावेश आहे.

सुभाष किसन राठोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मृताचा पुतण्या पवन राठोड याने घाटंजी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून मृताची पत्नी आदिना सुभाष राठोड (वय 32) व अंकुश दिलीप आडे (वय 26) या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. रात्री झोपेत असतानाच कोणीतरी सुभाषचा खून केल्याचा बनाव त्याच्या पत्नीने सकाळी उठून शेजाऱ्यांकडे केला. या घटनेचे वृत्त कळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताच्या पत्नीची उलट तपासणी केली. त्यानंतर तिने संशयित अंकुशच्या मदतीने सुभाषचा झोपेत शस्त्राने वार करून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
तिन्ही मुले झाली पोरकी
सुभाष राठोडच्या खुनानंतर त्याची पत्नीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची दोन मुली व एक मुलगा अशी तिन्ही मुले आता आईवडिलांच्या मायेपासून पोरके झाले आहेत. त्यामुळे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested with wife for murder of husband