कलम 370 मुळे भारताची राष्ट्रीयता अबाधित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्दिदिवसीय व्याख्यानमालेत प्रतिपादन, ‘कलम ३७० काल, आज आणि उद्या’ या विषयाची आपल्या खास शैलीत उकल केली. 

अकोला : ‘कलम ३७० ही भारताच्या एकात्मतेवर टांगती तलवार होती. पाकिस्तान कुरापती थांबविणार नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत ठोस निर्णय घेतला गेला. या काळात पाकिस्तानच्या बाजूने कुणीही उभे राहिले नाही. घटनात्मक पद्धतीने या कलमाच्या अनुंषगाने निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भारताची राष्ट्रीयता अबाधित राहण्यास मदत झाली. आता लवकरच कश्‍मिरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे महत्वपूर्ण प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

सोमवारी (ता.16) रा.तो.आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात काकासाहेब ठोंबरे स्मृती वाचनालयाच्यावतीने स्व.किशोरी हरिदास (बेबीआत्या) यांच्या स्मृती द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना धर्माधिकारी यांनी ‘कलम 370 काल, आज आणि उद्या’ या विषयाची आपल्या खास शैलीत उकल केली. यावेळी विचारपिठावर रा.स्व.संघाचे गोपाल खंडेलवाल, डॉ.पिंजर हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायला मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले की, ज्याप्रमाणे कश्‍मिर राज्याला 370 अंतर्गत वेगळा दर्जा देण्यात आला. तेथील राष्ट्रध्वज वेगळा, राज्य घटना वेगळी करण्यात आली, त्याप्रमाणे बंगाल, पंजाब, बिहार, आंध्रप्रदेशकडूनही वेगळ्या दर्जाची मागणी पुढे आली. मात्र यामुळे भारताची एकात्मता धोक्यात आली असती ही बाब ओळखून कश्‍मिरच्या 370 कलमासंदर्भात घेतला निर्णय हा विकासाच्या दिशेने पाऊलं टाकणार आहे. पुर्वी कश्‍मिरमध्ये भांडवल जावू शकत नव्हते. केंद्राच्या निधीवरच कश्‍मिर ते जगत होते. रोजगार निर्माण होऊ शकत नव्हता. पर्यायाने दहशतवाद, फुटिरतावाद पुढे येत असायचा मात्र आता 370 हटविल्याने भारताची राष्ट्रीयता अबाधित राहून कश्‍मिरचा विकास झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगत लवकरच तेथे विधानसभेच्या निवडणूकाही होणार असल्याचे सुचक वक्त्यव्य धर्माधिकारी यांनी येथे केले. व्याख्यानमालेच्या कार्क्रमाला अकोलेकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाच्या सचिव मोहिनी मोडक यांनी केले.

हेही वाचा - एमबीबीएसच्या जागा वाढवून द्या

 

Image may contain: 2 people, text

म्हणून सावरकर मृत्यूंजय
नगरच्या तरुंगात असताना राजकीय बंदी म्हणून पंडित नेहरूंना सगळी पुस्तकं, घरच खायला, घरची कपडे पुरविण्यात आली आणि त्यानंतर ‘भारताचा शोध’ हे पुस्तक लिहायचं आणि म्हणायचं ‘गजनीचा मोहम्मद हा रसिक असा साम्राज्य निर्माता आहे आणि शिवाजी लुटारू असे नमूद करीत, धर्माधिकारी यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा संदर्भ दिला व बॅ.सावरकरांच्या त्यागाची आठवण उपस्थितांना करून दिली. त्यांना घालावे लागले तसे कपडे यांना (नेहरूंना)कधी घालावे लागले नाही. अंदमानात यातना भोगाव्या लागल्या नाहीत. त्यानंतरही त्यांच्यासंदर्भात माफीविर म्हणून गदारोळ सुरु आहे. त्याचे संदर्भ यापूर्वीही देऊन झाली. ‘समर्थ भारत उभा राहावा’ हे सावरकरांचे स्वप्न आणि 65 च्या लढाईमध्ये भारताने पाकिस्तावर मात केली. तेव्हा सावरकर म्हणाले हे मला पाहता आले आता या देहाच काम संपले. म्हणून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी अन्न पाणी थांबविले. 26 फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली. म्हणून त्यांना आपण मृत्यूंजय म्हणतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article 370 the nationality of India