पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्रकार सरसावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर : कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली बुडाले. त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. हे ओळखून नागपुरातील चित्रकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आपल्या चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांतून येणारी रक्कम ते पूरग्रस्तांना पाठविणार आहेत.

नागपूर : कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली बुडाले. त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. हे ओळखून नागपुरातील चित्रकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आपल्या चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांतून येणारी रक्कम ते पूरग्रस्तांना पाठविणार आहेत.
"आर्ट कट्टा' आणि "विदर्भ कार्टूनिस्ट असोसिएशन'ने यासाठी पुढाकार घेतला आहे. 15 ऑगस्ट रोजी फुटाळा तलाव परिसरात चित्रकार गोळा होणार आहेत. तिथे जमलेल्या लोकांचे "कॅरिकेचर' आणि "पोर्ट्रेट' थेट त्यांच्यासमोरच काढणार आहेत. त्या बदल्यात पूरग्रस्तांसाठी देणगी द्या, असे आवाहनही करण्यात येणार आहे. या अनोख्या पुढाकाराचे उद्‌घाटन ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके आणि कवी लोकनाथ यशवंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात चित्रकार संजय मोरे, नितीन काळबांडे, सुधीर बागडे, निखिल काळे, उमेश चारोळे, अजय रायबोले, अमित गोनाडे, सोनाली चौधरी, रश्‍मी सेलवट, बाबर शरीफ, चंद्रशेखर वाघमारे, मौक्तिक काटे, अश्‍विन वासनिक, प्रफुल्ल तायवाडे, विलास महाजन आदी चित्रकार सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून गोळा झालेला निधी "सकाळ रिलीफ फाउंडेशन'च्या माध्यमातून पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.
चित्रकार आणि सहृदयांना आवाहन
पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी प्रत्येकच भारतीयाने पुढे आले पाहिजे. ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. या भावनेतून नागपूर शहरातील सर्व चित्रकार, चित्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट रोजी या अभियानात सहभागी व्हावे. तसेच आपली चित्रे काढून घेत सहृदय नागरिकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन विदर्भ कार्टूनिस्ट असोसिएशनचे संजय मोरे (मो. 9325055779) आणि आर्ट कट्टाचे नितीन काळबांडे (मो. 8600315587) यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artist, Painters rushed to help flood victims