अरूण झगडकरांची कविता राज्यात प्रथम

संदीप रायपुरे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुण्याच्या सावित्री कांबळे आणि औरंगाबादच्या ललिता ठुबे यांच्या कवितेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले आहे. तर सोलापूरच्या शैलेष उकरंडे यांच्या कवितेला तृतीय
मूर्तिजापूरच्या निलीमा आष्टिकर चतुर्थ, पुण्याच्या मृणाल घाटे आणि खंडाळ्याच्या अनघा पतके यांच्या कवितेला पाचवे स्थान मिळाले आहे.

गोंडपिपरी : अ.भा.अंधश्रध्दा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीच्या वतीने राज्यस्तरीय काव्यस्पर्धा घेण्यात आली.यात गोंडपिपरीचे कवी अरूण झगडकर यांच्या कवितेने प्रथम क्रमांक पटकविला आहे.राज्यभरातील 419 कविंनी यात सहभाग घेतला होता.त्यात झगडकरांच्या कवितेने बाजी मारली.

पुण्याच्या सावित्री कांबळे आणि औरंगाबादच्या ललिता ठुबे यांच्या कवितेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले आहे. तर सोलापूरच्या शैलेष उकरंडे यांच्या कवितेला तृतीय
मूर्तिजापूरच्या निलीमा आष्टिकर चतुर्थ, पुण्याच्या मृणाल घाटे आणि खंडाळ्याच्या अनघा पतके यांच्या कवितेला पाचवे स्थान मिळाले आहे.

उत्तेजनार्थ पुरस्कार डॉ. रविंद्र वेदपाठक, विजया पाटील,नवापुर, विजय सातपुते,पुणे, काशिनाथ महाजन, नाशिक , सचिन बागुल,वाशिंद , डॉ संजय संघवी,धुळे , रामभाऊ बैसाणे,धुळे , देवदत्त बोरसे,नामपुर, रामकृष्ण पाटील,डहाणू , विक्रम शिंदे,वेळू ,सातारा , जनार्दन भोये, हट्टीपाडा,पेठ सागर शेटे,अहमदनगर, भरत गावडे, बेळगाव, डॉ.जितेंद्र देसले, औरंगाबाद, सुरेश तायडे, मलकापुर, राकेश चौहान, सिंधुदुर्ग, अपर्णा परळकर, मुंबई यांच्या कविता ठरले आहेत असे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीचे आयोजक तानाजी शिंदे, जयराम मोरे, दिलीप पाटील, रंजन खरोटे, अजय बिरारी यांनी हि माहीती दिली.

Web Title: arun zagadkar poem