आर्यनच्या डाव्या गुडघ्यातून फेसाळलेला ‘स्राव’ 

आर्यनच्या डाव्या गुडघ्यातून फेसाळलेला ‘स्राव’ 

नागपूर - अवघ्या अकरा वर्षांचा आर्यन वाघाडे. यवतमाळच्या, झरी तालुक्‍यातील मुकुटबनजवळचे गाव. सहावीत शिकतो. वडील शिक्षक आहेत. मागील दहा महिन्यांपूर्वी ‘आर्यन’ सायकल चालवताना पडला. डॉक्‍टरकडून उपचार झाले. तो बरा झाला. मात्र, पंधरा दिवस उलटल्यानंतर डाव्या पायातील गुडघ्यातून पाणीसदृश स्त्राव निघणे सुरू झाले. त्वचेवर कोणतीही जखम दिसत नाही. मात्र, त्वचेतून निघणारा स्त्राव दोन मिनिटे राहतो. कधी साडेतीन मिनिटांपर्यंत असतो तर कधी हा स्त्राव निघणे आपोआपच बंद होते. सीटी स्कॅन केले, परंतु स्पष्ट निदान होत नसल्यामुळे आश्‍चर्य होत आहे. 

आर्यनच्या पालकांनी चिंता यामुळे वाढली असून उपचारासाठी त्याला मेडिकलमध्ये आणले. मात्र, डॉक्‍टरही हतबल होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पायातील डाव्या गुडघ्यातून पाणीसदृश स्त्राव होणारा हा ‘दुर्मीळ’ आजाराचा बालकावर उपचार सुरू झाले आहेत. मात्र, निदान होत नसल्याने जगभरातील वैद्यकीय जर्नलमधून माहिती घेण्यासाठी डॉक्‍टरांनी प्रयत्न सुरू केले आहेत.  

पालकांची धावपळ
पालकांनी मुलाला यवतमाळ येथील स्थानिक डॉक्‍टरांसह सोलापूर, तसेच इतर खासगी डॉक्‍टरांना दाखवले. नागपुरातही खासगी डॉक्‍टरांसहित सुमारे १५ तज्ज्ञ डॉक्‍टरांना दाखवले. आर्यनचा आजार बघताच डॉक्‍टरांनाही आश्‍चर्याचा धक्का बसतो आहे. त्यांना या आजाराची माहिती नसल्यामुळे इतर डॉक्‍टरांकडून उपचाराचा सल्ला दिला जातो. दरम्यान, मेडिकलच्या एका नातेवाइकाच्या मदतीने या रुग्णाचे पालक मंगळवारी मेडिकलच्या अस्थिरोग विभागात पोचले. अस्थिरोग विभागाच्या डॉक्‍टरांनी मुलाच्या पायातून स्त्राव होणारा व्हिडिओ बघितला. मुलाचे एक्‍सरे, सीटी स्कॅनसह इतरही तपासणी केली गेली. परंतु, स्त्राव होतो कुठून? याचे निदान झाले नाही. मेडिकलमधील डॉक्‍टरांनी शोधाशोध सुरू केली आहे. 

गुडघ्यावर जखम नाही. मात्र, पाण्यासारखा स्त्राव होतो. याचे निदान सीटी स्कॅनद्वारे केले. परंतु, दिसून आले नाही. एमआरआय करण्यात येईल. आयुष्यात अशाप्रकारचा पहिलाच रुग्ण बघण्यात आला आहे. या रुग्णांसदर्भात अस्थिरोग विभागप्रमुख तसेच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल  मित्रा यांचा सल्ला घेऊन वैद्यकीय जर्नलमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतर मुलावर अचूक उपचार करण्यात येतील. हा स्त्राव बंद करण्यासंदर्भात उपचार होतील हे मात्र नक्की. 
-डॉ. मोहमंद फैजल, अस्थिरोगतज्ज्ञ, ट्रॉमा केयर युनिट, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com