आशा कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

यवतमाळ : गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीच्या प्रश्‍नासाठी मंगळवारपासून आशा कर्मचाऱ्यांनी स्थानिक तिरंगा चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

यवतमाळ : गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीच्या प्रश्‍नासाठी मंगळवारपासून आशा कर्मचाऱ्यांनी स्थानिक तिरंगा चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
आशा स्वंयसेविकांना कामावर आधारीत मोबदला धरून अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. हे मानधन अत्यंत अल्प आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढून द्यावे, गटप्रवर्तक, आशांना शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा द्यावा, आदी विविध मागण्यांसाठी आशा कर्मचारी तसेच गटप्रवर्तकांनी स्थानिक तिरंगा चौकात आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आधी मागण्या मान्य करा त्यानंतरच आंदोलन मागे घेण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने दिले आहे. आंदोलनात कृती समितीचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातून आलेल्या आशा कर्मचारी सहभागी होत्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asha employees on strike