भाजप हा गुंडांचे पुनर्वसन करणारा पक्ष- अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

शिवसेनेला कुणी विचारत नाही. त्यांचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत आहेत. लोकांची कामे या सरकारला करता आली नाहीत. मुस्लिम, मराठा आरक्षणाचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णय अडकल्यानंतर भाजप सरकारला तो पेच अद्याप सोडविता आला नाही.

अकोला - "महापालिका निवडणुकीसाठी गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणावर तिकीट देणाऱ्या भाजपकडून गुंडप्रवृत्तीचे समर्थन केले जात आहे. भाजप हा पक्ष आता गुंडांचे पुनर्वसन करणारा पक्ष झाला आहे,'' असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोला येथे केला.

महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वराज्य भवनात सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आरिफ नसिम खान, नितीन राऊत, आमदार भाई जगताप आदी उपस्थित होते. भाजपकडून विकासाच्या भूलथापा दिल्या जात आहेत. विकासाचे अपयश लपविणाऱ्या भाजपने विद्यमान महापौरांनाही तिकीट नाकारले. दुसरीकडे गुंडांना तिकीट देऊन त्याचे सर्मथन करणारा भाजप गुंडांचे पुनर्वसन करणारा पक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेला कुणी विचारत नाही. त्यांचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत आहेत. लोकांची कामे या सरकारला करता आली नाहीत. मुस्लिम, मराठा आरक्षणाचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णय अडकल्यानंतर भाजप सरकारला तो पेच अद्याप सोडविता आला नाही. कॉंग्रेस सरकारच्या काळात वितरित निधीतूनच विकासाची कामे सुरू आहेत. योजनांची नावे बदलून काम केले जात आहे. अडीच वर्षांत कोणतेही विकासाचे काम न करणाऱ्या भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Ashok Chavan criticize bjp