भाजप-सेना म्हणजे 'आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ'!

मुनेश्‍वर कुकडे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

गोंदिया : भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज गोंदियात केली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी (ता. 11) जनसंघर्ष गोंदियात आगमन झाले. यावेळी जाहीरसभेत ते बोलत होते.

गोंदिया : भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज गोंदियात केली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी (ता. 11) जनसंघर्ष गोंदियात आगमन झाले. यावेळी जाहीरसभेत ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची जनता भाजप व शिवसेनेतील शिमगा पाहत आहे. शिवसेना, भाजप सध्या एकमेकांत भांडत आहेत. हे भांडण केवळ दिखाऊपणाचे आहे. एकीकडे भाजपवर टीका करायची व दुसरीकडे सत्तेचे श्रीखंड खायचे, हे जनतेला उमगले आहे. युती गेली खड्ड्यांत पहिले शेतकऱ्यांचे बोला असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गरजत होते. आता समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या म्हणत आहे. समृद्धी महामार्गातून येणारे श्रीखंड कोण कोण खाणार आहे, हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असा सवाल चव्हाण यांनी केला. 

दुष्काळाची दाहकता असताना शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेत नाहीत. अशा घोषणाबाज सरकारला तुम्हीच घराचा रस्ता दाखवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. 

व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री नसीम खान, माणिकराव ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार, आशीष देशमुख, के. आर. शेंडे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिलाध्यक्ष उषा शहारे, माजीमंत्री बंडू सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

पुढील दोन महिन्यांत हे सरकार सर्वसामान्य लोकांना अनेक फंडे देतील, अनेक घोषणा करतील, अनेक निर्णय घेतील. पण या घोषणा, निर्णयांकडे लक्ष देऊ नका. चौकीदार चोर आहे असे म्हटले जाते. देशाचा चौकीदार चोर आहे. या चौकीदाराने सगळी गडबड केली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Ashok Chavan targets BJP and Shiv Sena over possible alliance for Lok Sabha 2019