अशोक चव्हाणांच्या पोस्टरला फासले काळे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट देऊनही काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

अमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट देऊनही काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजप सरकारच्या विरोधात रान उठवले असताना सर्वोच्च न्यायालयाने मात्र केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे.

मोदी सरकारवर केलेल्या आरोपांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने कॉंग्रेसला चपराक लगावली असल्याचं आता भाजप तर्फे बोलल्या जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र अजूनही संयुक्त संसदीय समितीच्या मुद्द्यावर ठाम आहे. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आज अमरावती मधेही दिसून आले.

Web Title: Ashok Chavans poster gets Painted From BJYM Workers (Video)