गडकरी आणि रोडकरी यांच्यात साटेलोटे : अशोक सोनोने

श्रीधर ढगे
सोमवार, 2 एप्रिल 2018

* शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबविले
* 50 दिवसापासून सुरु आहे साखळी उपोषण

खामगाव (बुलडाणा): महामार्ग रुंदीकरण कामात शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात संपादित केल्या जात आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यात येत आहे, कारण गडकरी आणि कंत्राटदार अर्थातच रोडकरी यांच्यात साटेलोटे आहे, असा आरोप भारिप बहूजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव लागतच्या महामार्ग क्रमांक ६ चे सहापदरीकरण सुरू आहे. बायपास खामगाव शहराच्या बाहेरून जातोय. या महामार्गाचे काम करताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, शासन त्यांच्या शेतीचा योग्य मोबदला देत नाही. योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे वर मागील 50 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र, त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले असून जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाहीतोपर्यंत काम चालू होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, आज (सोमवार) भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी महामार्गावर 3 ठिकाणी सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी सोनोने यांनी सरकारवर टीका करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोडकरी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. भारिप शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील असेही ते म्हणाले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती निलेश दिपके, संजय शर्मा, विनायक देशमुख व शेतकरी संघर्ष समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: ashok sonone political attack on nitin gadkari