अटलजींच्या निधनाने गोंडपिपरीतील आठवणी ताज्या

संदीप रायपुरे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

गोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे काल (ता. 16) सायंकाळी निधन झाले. आणि देशभरात शोकमय वातावरण पसरले. वाजपेयींनी पक्षाच्या कार्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी पक्ष वाढविला. यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांना मोकळी वाट करून देत आठवणीँना उजाळा दिला.

अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी सायंकाळी पाच वाजून पाच मिनीटांनी समोर आली. आणि देश शोकमग्न झाला. आपल्या कौशल्याने विरोधाकांचे नामोहरण करणाऱ्यांना या सच्च्या नेत्याला सर्वजण श्रध्दांजली देऊ लागले.

यावेळी त्यांच्या कतृत्वावर प्रकाश टाकतांना अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशातून गोंडपिपरीतून आज अटलबिहारी वाजपेयींसंदर्भातील ऐतिहासिक आठवण समोर आली. 1984 साली अटलबिहारी वाजपेयी यांचा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सत्कार आयोजीत केला होता. अहेरीतील सिदय्या मध्दीवार या पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्याने हा कार्यक्रम आयोजीत केला होता.

या कार्यक्रमासाठी अटलबिहारी वाजपेयी तिकडे निघाले. चंद्रपूर जिल्ह्याचे संघाचे जेष्ठ दादा देशकर यांच्यासोबतीने ते हा दौरा करणार होते. चंद्रपूर अहेरीच्या मधोमध गोंडपिपरी येते. येथील तेव्हाचे पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते वामनराव बोनगिरवार, तालुकाध्यक्ष दिनकर तिवाडे,यांना वाजपेयींच्या दौर्याविषयी ऊत्सुकता होती. वामनरावांचे चिरंजीव दिपक बोनगीरवार पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीचे सदस्य होते.

अशावेळी गोंडपिपरीवरून जात असल्याने वाजपेयी यांनी काही वेळ दिला पाहिजे अशी माफक अपेक्षा वामनराव बोनगिरवार यांनी व्यक्त केली,
अटलबिहारी वाजपेयी अहेरीला जात असतांना गोंडपिपरीमे रूकना है. असे ड्रायव्हरला सांगितले होते.

गोंडपिपरी येताच वाजपेयींच वाहन बोनगिरवारांच्या घरासमोर, थांबले, त्यांच्या घरी चहा वगैरे झाला. मग वामानराव बोनगिरवार, दिनकर तिवाडे, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी. डॉ. रमेश वांदिले अन काही कार्यकर्त्यांना अटलबिहारी वाजपेयींनी मार्गदर्शन केले.

यानंतर ते अहेरीला गेले. तिथे अहेरीचे पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते सिदय्या मध्दीवार यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी दोन लाख रूपयाने भरलेली थैली वाजपेयींना भेट देण्यात आली.

आज अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आणि देशभरातून शोकमय प्रतिक्रिया यायला लागल्या. अशात गोंडपिपरीतील दिपक बोनगिरवार, त्यांचे बंधू प्रदीप बोनगिरवार, मुलगा स्वप्नील बोनगिरवार व पूर्ण कुटुंबियांसह अटलजींना गोंडपिपरीतील अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

त्यांचाही मृत्यू...
1984 साली गडचारोली जिल्ह्यातील अहेरी येथे अटलबिहारी वाजपेयी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजीत करणारे सिदय्या मध्दीवार यांचा काल मृत्यू झाल्याची माहिती दिपक बोनगिरवार यांनी सकाळला दिली.

Web Title: atal bihari vajpayee visited gondpipari