अतिक्रमणविरोधी पथकावर मोमिनपुऱ्यात दादागिरी

मोमिनपुरा ः रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमण काढताना महापालिका पथकातील कर्मचारी.
मोमिनपुरा ः रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमण काढताना महापालिका पथकातील कर्मचारी.

नागपूर : रस्त्याच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांनी आज कारवाईसाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर दादागिरी केली. मात्र, अतिक्रमणधारकांच्या विरोध व दादागिरीला मोडीत काढत कारवाईस सुरुवात केल्याने त्यांनी शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पथकाने 64 अतिक्रमणे हटवीत फुटपाथ व रस्ते मोकळे केले.
अतिक्रमणधारकंच्या तावडीतून रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक आज दुपारी मोमिनपुरा परिसरात पोहोचले. दोसर भवनापासून अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरुवात केली. मात्र, मोमिनपुऱ्यात पोहोचल्यानंतर येथील अतिक्रमणधारकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पथकातील कर्मचारी व अतिक्रमणधारकांत वादही झाला. काही अतिक्रमणधारकांनी शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे तणाव वाढला. मात्र, पोलिसांनी यावेळी आक्रमकपणे अतिक्रमणधारकांचा विरोध मोडीत काढला. पोलिसांच्या उपस्थितीत पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. या भागातील फुटपाथ व रस्त्यांवरील ओट्यांचे अतिक्रमण तसेच शेड तोडण्यात आले. त्यानंतर पथकाने मोमिनपुरा ते मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग व गोळीबार चौकापर्यंतचे दोन्ही बाजूंचे अतिक्रमण काढले. या भागात एकूण 64 अतिक्रमणे काढण्यात आली तर दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात भास्कर माळवे, मंथनवार, शाह यांनी पार पाडली.
हनुमाननगर, नेहरूनगरमध्येही अतिक्रमण भुईसपाट
अतिक्रमणविरोधी पथकाने हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील एकूण 59 अतिक्रमणे काढली. हनुमाननगर झोनअंतर्गत तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक, उदयनगरपर्यंतचा रिंग रोड, आशीर्वादनगर चौक ते दत्तात्रयनगर चौकापर्यंत, अयोध्यानगर ते तुकडोजी पुतळा चौक-सुपर हॉस्पिटलपर्यंत एकूण 34 अतिक्रमण काढली. नेहरूनगर झोनअंतर्गत भांडे प्लॉट चौक ते गुरुदेवनगर चौक-नंदनवन चौक- जगनाडे चौक या मार्गावरील दोन्ही बाजूंची 25 अतिक्रमणे काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com