एटीएम @ 100

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नागपूर - नव्या नोटांचा व्यवहार करण्यासाठी एटीएम यंत्रे सुसज्ज नसल्याने शहरातील सर्वच एटीएममधून फक्त शंभरच्या जुन्याच नोटा वितरित होत आहेत. आवश्‍यक ते बदल केल्यानंतरच एटीएममधून दोन हजारांच्या नव्या नोटांचे वितरण करता येईल, असे बॅंकेच्या एका अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

नव्या दोन हजार रुपयांच्या नोटांची ठेवण आणि आकार नवीन असल्याने एटीएम मशीन्समधून या नोटा वितरित करता येणे शक्‍य नाही. त्यामुळे एटीएम मशीन्सची नव्या गरजांनुसार जोडणी करावी लागणार आहे. बॅंकांना सामान वाहतुकीची सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यानेही एटीएम मशीन्सची पुनर्जोडणी करावी लागणार असल्याचेही सांगितले. यासाठी प्रत्येक एटीएम केंद्रावर अभियंत्यांची चांगलीच धावपळ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 500 आणि एक रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरात एकच गदारोळ उडाला. या घोषणेनंतर सध्या बॅंक आणि एटीएम केंद्रांबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. एटीएम सेवा शुक्रवारपासून पूर्ववत होण्याची घोषणा करण्यात आली असली, तरीही प्रत्यक्षात अजूनही एटीएम यंत्र आणि ते चालण्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रणालीमध्ये आवश्‍यक त्या सुधारणा झालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही काही दिवस सगळी एटीएम सुरू होण्याची शक्‍यता नसल्याचे समोर आले आहे. सध्या विस्कळीत झालेली एटीएम सेवा पूर्ववत होण्यास आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: atm @ 100