esakal | कुठे सॅनिटाईझर गायब तर कुठे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; ATM ठरताहेत कोरोना संसर्गाचे कारण 
sakal

बोलून बातमी शोधा

https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/it-was-time-beg-because-could-not-get-rider-346369

काही महिन्यांपूर्वी शहराच्या काही भागांपुरता मर्यादीत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गावोगावी वाढला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात घुसलेल्या कोरोना विषाणूने आता गावखेड्यांतील कानाकोपरा व्यापून टाकला आहे.

कुठे सॅनिटाईझर गायब तर कुठे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; ATM ठरताहेत कोरोना संसर्गाचे कारण 

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : कोरोना विषाणूच्या काळात प्रत्येक एटीएमस्थळी सॅनिटायझरची सोय करणे गरजेचे आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएमस्थळी ही सुविधा नाही. पैसे टाकण्याकरिता आणि काढण्याकरिता येणाऱ्या खातेदारांत सुरक्षित अंतर पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

काही महिन्यांपूर्वी शहराच्या काही भागांपुरता मर्यादीत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गावोगावी वाढला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात घुसलेल्या कोरोना विषाणूने आता गावखेड्यांतील कानाकोपरा व्यापून टाकला आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांचीदेखील चिंता वाढली आहे. प्रशासन उपाययोजना आखण्यात गुंतले असतानाही कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 

सविस्तर वाचा - खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण 

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता.18) 4 हजार 122 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात एकट्या गोंदिया तालुक्‍यात 2 हजार 428 रुग्णांची नोंद आहे. सध्या क्रियाशील रुग्ण 1 हजार 541 इतके आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असले तरी, दररोज बाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेत भर घालणारी आहे. 

अनलॉक मोहीम सुरू झाल्यापासून सातत्याने रुग्णसंख्येचा आकडा फुगत आहे. यात भर म्हणजे, प्रशासनाने लादलेल्या नियमांचे होत असलेले उल्लंघनदेखील कारणीभूत आहे. पैसे काढणे व टाकण्याकरिता दररोज एटीएम केंद्रांत खातेदारांची मोठी गर्दी झालेली दिसते. प्रशासनाच्या नियमानुसार, एटीएम केंद्रात येणाऱ्या प्रत्येक खातेदारांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश केंद्रात सॅनिटायझरची व्यवस्था नाही. एटीएम केंद्राच्या परिसरात पैसे काढणे आणि टाकण्याकरिता येणाऱ्या खातेदारांत सुरक्षित अंतर राहात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. दरम्यान, प्रशासनाने योग्य दखल घेऊन एटीएम केंद्रस्थळी सॅनिटायझरची व्यवस्था करणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे.

असे का घडले? - तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष

सुरक्षारक्षकाविना केंद्रे वाऱ्यावर

एटीएम केंद्रस्थळी सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. परंतु, शहरासह जिल्ह्यातील एटीएम केंद्रे सुरक्षा रक्षकाविना वाऱ्यावर आहेत. केंद्रांत कचऱ्याचा पसारा दिसून येतो.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image