एटीएममधून निघाल्या मजकूर लिहिलेल्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

नागपूर - गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांवर कोणतीही खाडाखोड केलेली असेल अथवा पेनाने काही लिहिले असेल तर त्या स्वीकारल्या जाणार नाहीत असे, रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. परंतु, एटीएममधूनच पेनाने अनावश्‍यक मजकुर लिहीलेल्या नोटा बाहेर येत असल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

पन्नास ते दोन हजारांपर्यंतच्या नवीन नोटांवर काहीही लिहू नये, शाई अथवा रंग लावू नये  तसेच जर या नोटांवर कोणत्याही प्रकारचे धार्मिक चिन्ह अथवा राजकीय घोषणा किंवा मजकूर  लिहिण्यात आला असेल तर, त्या रद्द ठरविण्यात येतील, असेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. परंतु, अशा प्रकारच्या लिहीलेल्या नोटाच एटीएममधून बाहेर पडत असल्याच्या तक्रारी समोर येत  आहेत. लिहीलेल्या नोटा बॅंकेत डिपॉझिट करण्याची सुविधा उपलब्ध असली तरी, यात वेळेचा अपव्यय होत असल्याची ओरड होत आहे. 

बॅंकांवर कारवाईची तरतूद 
शहरातील काही बॅंकांमध्ये लागलेल्या नोटिसांमध्ये पाचशे आणि दोन हजारच्या नोटांवर काहीही मजकूर असल्यास, त्या स्वीकारल्या जाणार नसल्याचे बोर्ड झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता, खराब झालेल्या, फाटलेल्या, लिखाण असणाऱ्या नोटा बॅंकांनी स्वीकारणे बंधनकारक असून ज्या बॅंका नकार देतील त्यांच्यावर कारवाईची तरतूदही असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. दहा रुपयांचे नवीन नाणे अवैध ठरवून काही व्यापाऱ्यांकडून, पेट्रोलपंप व्यावसायिकांकडून ते स्वीकारण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर दहा रुपयांचे नवीन नाणे वैधच असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. 

डिजिटल व्यवहार करावा
सध्या रिझर्व्ह बॅंकेतर्फे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्टफोनधारकांसह फीचर फोनधारकांनीही डिजिटल व्यवहारांचा वापर करावा, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. फीचर फोनधारकांनी *९९#  ंडायल केल्यास त्यांना इंटरनेटविना दोन खात्यांमध्ये व्यवहार करता येणे शक्‍य आहे. त्यासाठी त्यांना याच क्रमांकावर कॉल करून नोंदणी करावी लागेल.

Web Title: ATM Noted Text CUrrency