एटीएमकार्ड बदलून लुबाडले 40 हजार

file photo
file photo

अमरावती : पैसे काढण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन तोतयाने एका व्यक्तीच्या खात्यातून एटीएमकार्डची अदलाबदल करून 40 हजार रुपये लुटून फसवणूक केली. सचिन श्रीकृष्ण ढेपे (वय 30 रा. तुळजापूर जहागीर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री. ढेपे हे पैसे काढण्यासाठी परतवाडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळच्या एसबीआय एटीएम सेंटरवर गेले. त्यांनी पहिल्यांदा 15 हजार रुपये काढले. दुसऱ्यांदा तेच एटीएमकार्ड टाकून 5 हजार रुपये काढले. परंतु दुसऱ्यांदा टाकलेले त्यांचे एटीएमकार्ड त्यातून निघत नव्हते. त्यांच्या मागे असलेल्या अनोळखी व्यक्तीने एटीएमकार्ड काढण्यासाठी पुढाकार घेतला. व ढेपे यांचे मूळ कार्ड स्वत:जवळ ठेवून त्यांच्या हातात दुसरेच बनावट एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्यांच्याच खात्यातून अनोळखी व्यक्तीने कार्ड घेऊन, पासवर्ड आधीच लक्षात ठेवला असल्याने, ढेपे यांच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com