अजनीत दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अजनी - पंकज (४२) मुंबईच्या तेल कंपनीत काम करतो. त्याची पत्नी व दोन मुले अजनी ठाण्यांतर्गत मोठ्या भावाच्या कुटुंबासोबत राहते. पंकज सुट्टी घेऊन घरी आला होता. मोठ्या भावाची दोन वर्षांची मुलगी मुलांसोबत खेळण्यासाठी त्याच्या खोलीत येत होती. संधी साधून पंकजने तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. १२ ऑगस्टला चिमुकलीला अचानक अस्वस्थ वाटू लागले. आईवडील तिला उपचारार्थ दवाखान्यात घेऊन गेले. 

डॉक्‍टरांनी मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती दिली. आईला आधीपासूनच पंकजवर संशय होता. त्याला याबाबत विचारले असता नकार दिला. कुटुंबीयांचा दबाव वाढताच तो घरून पसार झाला. पीडितेच्या आईवडिलांनी अजनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पंकजवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Atrocity on 2 year girl crime