आमदार राणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

अमरावती - खासदार आनंद अडसूळ यांच्या तक्रारीवरून युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध रविवारी (ता. २९) दुपारी ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सिटी बॅंक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच मुद्द्यावरून खासदारांच्या नावाचा उल्लेख करत बदनामी करण्याचे काम मॅसेजच्या माध्यमाने आमदार राणा व त्यांच्या काही समर्थकांकडून सुरू आहे, असा आरोप खासदार अडसूळ यांनी तक्रारीतून केला.

राणांनी आरोप केल्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांची भेट घेत आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात आमदार राणा यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार आहेत.

दहा गुन्हे दाखल झाले तरी चालतील
सिटी बॅंकेत झालेल्या घोटाळ्याबाबत मी आवाज उठविला. गोरगरिबांची आयुष्याची जमापुंजी मिळावी यासाठी माझा लढा आहे. एखादा घोटाळा उघड करणे, हा गुन्हे आहे का? जोपर्यंत गोरगरिबांचे पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा लढा सुरूच राहील. मग असे दहा गुन्हे दाखल झालेत तरी चालतील. 
- रवी राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ

Web Title: Atrocity Crime on MLA Ravi Rana