घ्या आता... दारूसाठी सुरू झाली मारामारी, डिलिव्हरी बॉयवर प्राणघातक हल्ला

रविवार, 7 जून 2020

शेगाव नाका परिसरातील रंगोली वाईनशॉप समोर ही घटना घडली. नरेश टाटर असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाईनशॉप मालक नितीन राघवेंद्र देशमुख यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमरावती : डिलिव्हरी बॉयजवळ ऑर्डर न नोंदविता दुकानातून थेट दारूची मागणी करणा-याला मनाई करण्यात आल्याने चिडलेल्या एका व्यक्तीने लोखंडी रॉडने डिलिव्हरी बॉयवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरात घडली.

शेगाव नाका परिसरातील रंगोली वाईनशॉप समोर ही घटना घडली. नरेश टाटर असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाईनशॉप मालक नितीन राघवेंद्र देशमुख यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील वाइनशॉप सुरू झाले. शॉपमधून पूर्वीप्रमाणे  प्रशासनाने दारूविक्रीस मनाई केली आहे. त्यामुळे ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर डिलिव्हरी बॉयकडून मद्य मिळते. 

शनिवारी (ता. सहा) प्रेमराज गोले (रा. दत्तवाडी) याने वाइन शॉपमध्ये जाऊन दारूची मागणी केली. दुकान मालकाने त्यासाठी डिलिव्हरी बॉयजवळ ऑर्डर नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यावरून चिडलेल्या प्रेमराज याने डिलिव्हरी बॉय नरेशवर लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. हल्ला केल्यानंतर प्रेमराजने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडील रॉड हिसकून चोप दिला. त्यानंतर प्रेमराजला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

होम डिलिव्हरी नावापुरतीच
शहरात बऱ्याच दारू दुकानांतून चोरून थेट विक्री सुरू आहे. त्यामुळे दुकानापासून दहा ते पंधरा फुटावर ग्राहकांची गर्दी दिसते. त्यांना कुणी हटकत नाही. ब-याच ठिकाणी पार्किंगची सुद्धा अडचण होते. नियमबाह्यपणे हे सुरू असताना संबंधित विभाग कुणाचाच कारवाई करताना दिसत नाही.