Vidhan Sabha 2019 : आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

Vidhan Sabha 2019 : आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

अमरावती : राज्याचे कृषिमंत्री आणि भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर आज (सोमवार) सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात बोंडे-भुयार निवडणूक लढवित आहे.

भुयार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सुदैवाने ते बचावले आहेत. त्यांची चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत त्यांच्यावर चार राऊंड फायर केल्याचीही माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात ही घटना घडली.

दरम्यान, भुयार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले असून, गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com