डॉक्‍टरवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेली चिमुकली डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावली असा आरोप करीत नातेवाइकाने वॉर्डात चाकू घेऊन प्रवेश केला.

वॉर्डात तोडफोड करीत, शिवीगाळ करीत चाकू घेऊन डॉक्‍टरच्या मागे धावला. डॉक्‍टरने पळ काढला. मात्र सुरक्षारक्षक आडवे आले. ते यात जखमी झाले. त्यांच्यावर मेयोत उपचार सुरू आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली. परिचारिकांसह, नातेवाइकांची पळापळ सुरू झाली. दोन तास मेयोच्या वॉर्डात तणावाचे वातावरण होते. 

सोमवारी सकाळी १० वाजता मेयोत दगावलेल्या अलिना खान असे सहा वर्षीय चिमुकलीचे नाव होते. ती वॉर्ड क्रमांक ७ मध्ये तीन दिवसांपूर्वी भरती झाली होती. ‘ग्वालिन बार सिंड्रोम’ हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान होताच डॉक्‍टरांनी नातेवाईकांना या गंभीर आजाराची माहिती दिली होती. प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले. दरम्यान, सोमवारी सकाळी आई, मामा व इतर नातेवाइकांनी मेयातील वॉर्डात तोडफोड सुरू केली.

येथील वॉर्डाच्या काचा तोडल्या. खाटांची तोडफोड केली. चिमकुलीच्या मृत्यूस डॉक्‍टरच कारणीभूत असल्याचा आरोप करीत निवासी डॉक्‍टरला शिवीगाळ करीत हातात चाकू घेऊन अंगावर धावून गेला. मात्र महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे दोन सुरक्षारक्षक मदतीला धावून आले. परंतु नातेवाइकाने त्यांच्यावरच वार केला. दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. दरम्यान, तहसील पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देताच तत्काळ पोलिसांचा ताफा पोहचला. अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्या तक्रारीवरुन तहसील पोलिसांनी आरोपी आरोपीचे नाव सलमान शाहिद (सिंधीबन ताजाबाग) याला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीलाही मेयोत भरती करण्यात आले आहे. आरोपीविरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.

डॉक्‍टरवर चाकू उगारणाऱ्यावर उपचार
चिमुकली दगावल्याने संतप्त झालेल्या सोमवारी (ता.७) सकाळी सलमान शाहिद या नातेवाईकाने डॉक्‍टरवर चाकू उगारला, शिविगाळ केली, तोडफोड केली. मात्र पोलिसांनी बळाचा वापर केल्याने सलमान जखमी झाला. यामुळे त्याला मेयोत उपचारासाठी आणले. मात्र, मारहाण करणाऱ्याच्या विरोधात कोणताही आकस न दाखवता, डॉक्‍टरांनी आपला सेवाधर्म म्हणून आरोपी सलमानवर उपचार केले. सलमान मात्र खजील झाला. आपण चुकीचे वागलो अशी कबुली त्याने पोलिसांजवळ दिली. 

Web Title: attack on doctor crime