झोपेत वाघाचा व्यक्तीवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

भिसी (जि. चंद्रपूर) : भिसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ, रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. रविवारी (ता. 4) रात्री झोपेत असलेल्या होमराज गंगाराम साठोणे यांच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वॉर्ड क्रमांक सहा येथे होमराज साठाणे यांचे घर आहे. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर साठोणे कुटुंबीय झोपले. होमराज साठाणे घरासमोर बाजेवर लोटले होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वाघाने तेथून धूम ठोकली. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे रानुडकर गावात शिरले होते. नागरिकांनी त्याला गावाबाहेर हुसकावून लावले. टीचर कॉलनी परिसरात रोज वाघाचे दर्शन होत आहे. प्रकाश चिकाटे यांच्या कोंबड्या वाघाने फस्त केल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack a tiger person in sleep