तरुणावर तलवारीने हल्ला

file photo
file photo

महागाव (जि. यवतमाळ) : अंगणात कचरा टाकण्याच्या कारणात शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांवर आरोपींनी तलवारीने हल्ला चढविला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.18) महागाव येथे घडली.
ओंकार ऊर्फ ऋषभ विलास नरवाडे (वय 20, रा. महागाव) असे मृताचे नाव आहे. मनोज माधवराव भरवाडे (वय 25) हा गंभीर जखमी आहे. महागाव-उमरखेड मार्गावरील मातोश्री विद्यालयाच्या परिसरात अंजानराव नरवाडे व गजानन रामचंद्र राठोड यांचे कुटुंब शेजारी राहतात. राठोड कुटुंबाने मांसाहार करून फेकलेला कचरा अंगणात पडल्याने नरवाडे यांच्या पत्नी बेबी हिने राठोड कुटुंबीयांना कचरा का टाकता म्हणून विचारणा केली. त्यावरून सकाळी सातला या दोन कुटुंबात वादाची ठिणगी पडली. संशयित आरोपी गजानन रामचंद्र राठोड (वय 32 ), वाघू रामचंद्र राठोड (वय 27), मालू गजानन राठोड (वय 27), जयश्री वाघू राठोड (वय 22) यांनी लोखंडी रॉड घेऊन संगनमताने हल्ला केला. त्यात दुर्गेश नरवाडे व बेबी नरवाडे जखमी झालेत. या घटनेची सकाळीच पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेताना तत्परता दाखविली नाही. दरम्यान, दोन्ही शेजाऱ्यांत सलोख्याचे वातावरण राहावे, म्हणून ओंकार उर्फ ऋषभ नरवाडे, मनोज भरवाडे हे काही मित्रांसह मध्यस्थी करण्यासाठी गेले. त्यावेळी संशयित गजानन राठोड व वाघू राठोड यांनी घरातून तलवार आणून ओंकारच्या पोटावर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात तो जमिनीवर कोसळला. मदतीला धावलेल्या मनोज याच्यावरही आरोपींनी तलवारीचा वार केला.
आरोपींची शरणागती
भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून केल्याप्रकरणी चारही संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांनी घटनेनंतर लगेच पोलिसांत आत्मसमर्पण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com