आनंदच्या खुनाचा बदल्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नागपूर : कोतवालीतील गुजरनगरात झालेल्या आनंद शिरपूरकर हत्याकांडातील आरोपीच्या घरांवर वस्तीतील लोकांनी हल्ला केला. आरोपीच्या घरावर दगडफेक केली तसेच त्याच्या घरासमोरील वाहनांची जाळपोळ केली. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला. विक्की संतोष तिवारी (24), अमित अरुण ढांडे (22), सौरभ मुनीश्‍वर चिचिरमारे (19), चंद्रदर्शन लहानू रंगारी (50), शरद यशवंतराव दुधे (37) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलैला रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी रितेश शिवेरकर, प्रफुल्ल शिवेरकर, समीर शेंडे, प्रदीप काळे (सर्व. रा. गुजरनगर) आणि यश गोस्वामी (पारडी) यांनी गुंडगिरी आणि वसुली करण्यासाठी टोळी तयार केली, तसेच कोतवाली परिसरात पोलिसांशी आर्थिक संबंध ठेवून जुगारअड्डा सुरू केला होता. आनंद शिरपूरकरने गेल्या तीन महिन्यांपूर्वी जुगारात हरलेल्या रितेशला 15 हजार रुपये उसने दिले होते. एका महिन्यात पैसे परत करण्याचा दोघांत करार झाला होता. मात्र, तीन महिने लोटूनही रितेश पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. तर पैशासाठी आनंद रितेशला धमक्‍या देत होता. आनंदच्या पैशासाठीच्या नेहमीच्या तगाद्याला कंटाळून रितेशने त्याचा "गेम' करण्याचा कट रचला. त्याने टोळीतील अन्य सदस्य प्रफुल्ल, समीर, प्रदीप आणि यश यांनी आनंद आणि त्याचा मित्र प्रवीण रंगारीवर फिल्मीस्टाइलने चाकू-तलवारीने वार केले तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या प्रवीण रंगारी यालाही मारहाण केली. आनंदच्या खुनात रितेशचे वडील चिरत शिवरेकर आणि त्याच्या बहिणीने आरोपींना मदत केली. त्यामुळे वस्तीतील नागरिकांनी शिवरेकर कुटुंबीयांच्या घरावर बुधवारी रात्री हल्ला केला. त्याच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच आरोपीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चिरत शिवरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An attempt to avenge the murder of Anand