मद्यतस्करीचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूच्या बाटल्या घेऊन जाण्याचा प्रयत्न गणेशपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी दोन मद्यतस्करांना जेरबंद करीत त्यांच्याकडून दारूच्या ५२५ बाटल्या हस्तगत केल्या. 

रमेश तुळसीराम जाट (३२) रा. करोना नाला खैरी, अधारताल, जि. जबलपूर आणि अभिलेश जाट (२८) रा. करोना नाला, निखीनगर, जि. जबलपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गणेशपेठ ठाण्याचे नायक पोलिस शिपाई प्रवीण गोरटे हे गुरुवारी सायंकाळी जाधव चौकातून गस्त घालीत असताना  हिंदुस्थान ट्रॅव्हल्ससमोर सार्वजनिक रोडवर दोन्ही आरोपी खासगी बसची वाट बघत उभे असल्याचे दिसले. त्यांच्याकडे वजनी साहित्य असल्याने गोरटे यांचा संशय बळावला. चौकशीदरम्यान बॅगेची झाडाझडती घेतली असता त्यात एकूण ४१ हजार ५०० रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. हा मद्यसाठा विक्रीसाठी चंद्रपूरला नेत असल्याचे त्यांनी कबूल केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.  

Web Title: attempt to smuggle wine is unsuccessful