ते लपून आले आणि निघून गेले, वाचा... काय झाले... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

ग्रामीण भागात दिवाळी आणि सांस्कृतिक मंडई महोत्सव आटोपल्यानंतर भाऊबीजनिमित्त गावातील बरेच कुटुंब बाहेरगावी जातात. याच संधीचा फायदा घेत कन्हान पोलिस ठाण्याअंतर्गत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, दोन ठिकाणी त्यांना यश आले. 

टेकाडी (जि. नागपूर) : कन्हान पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टेकाडी येथे चोरट्यांनी पाच घरी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. दोन घरी चोरी करण्यात चोरटे यशस्वी झाले; मात्र तीन घरांच्या मागच्या दारांच्या कुंडी तोडूनही घरात शिरणे जमले नसल्याने त्यांचा प्रयत्न फसला. काहींच्या घराच्या कुंड्या बाहेरून लावून ठेवल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी गावात गस्त वाढविण्याची मागणी कन्हान पोलिसांना केली आहे. 

Image may contain: indoor
याच आलमारीतून सामान चोरी गेले

गावात दिवाळी आणि सांस्कृतिक मंडई महोत्सव आटोपल्यानंतर भाऊबीजनिमित्त गावातील बरेच कुटुंब बाहेरगावी जातात. याच संधीचा फायदा घेत कन्हान पोलिस ठाण्याअंतर्गत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारच्या मध्यरात्री टेकाडी वसाहतीमध्ये चोरट्यांनी पाच घरांमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील हंसराज राऊत आणि मनोहर ढगे यांच्या घरी चोरटे चोरी करण्यात यशस्वी झाले. 

Image may contain: 9 people, people standing and outdoor
पोलिसांना चोरीची माहिती देताना हंसराज राऊत 

हंसराज राऊत यांच्या घरून साधारणतः साठ हजार रुपयांचे सोने व रोकड चोरी गेली. त्यांची पत्नी भाऊबीजेनिमित्त माहेरी गेली होती. सोमवारी रात्री हंसराज राऊत हे हॉलमध्ये झोपले असताना मागच्या दारातून चोरट्यांनी घरात शिरून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, अडीच तोड्याचे मंगळसूत्र, पाच ग्रामचे कानातले, साडे तीन ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅम कानातले, तीन ग्रॅम काळी गळसुली लंपास केली. 

Image may contain: 2 people, people sitting, table and indoor
तक्रार दाखल करताना पोलिस 

कृष्ण मंदिराजवळील मनोहर ढगे यांच्या घराच्या मागच्या दाराची कुंडी तोडून चोरटे आत शिरले आणि कपाटात ठेवलेले तीन हजार रुयये लंपास केले. गोंधळ झाल्यास परिसरातील कुणी झोपेतून उठून येऊ नये म्हणून चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घराच्या दाराच्या कुंड्या बाहेरून लावून ठेवल्या होत्या. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हंसराज राऊत यांनी मजुरीवर कमावलेली पुंजी चोरट्यांनी नेल्याने त्यांच्या समक्ष मोठा प्रश्‍न उभा थाटला आहे. हंसराज राऊत यांनी पोलिसात तक्रार केली असून, इतर कुणीही अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. ग्रामस्थांची कन्हान पोलिसांना गस्तीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, people sitting and indoor
घरात पडलेले सामान 

गावात मोठी चोरी करण्याचा प्रयत्न 
दोन घरी चोरी यशस्वी झालेली पाहून चोरट्यांनी दादाराव राऊत यांच्याही घराची कुंडी तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु, घरातील महिला जाग्या झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. इतक्‍यावरच चोरटे थांबले नसून इश्‍वर टाकळखेडे आणि धनराज नागपुरे यांच्याही घराच्या मागच्या दाराच्या कुंड्या तोडल्या. मात्र, चोरटे घरात शिरू शकले नाही. यामुळे ही तीन घरे थोडक्‍यात बचावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to break into the house in five places