"मधुरांगणचे सदस्य व्हा आकर्षक भेट मिळवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - महिलांच्या हक्‍काचे व्यासपीठ असलेल्या "सकाळ-मधुरांगण'ने अगदी कमी वेळात महिलांच्या मनात जागा केली. मधुरांगणने गेल्यावर्षी विविध उपक्रम राबवून महिलांची मने जिंकली. त्यामुळे मधुरांगणचे सदस्यत्व मिळविण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ सुरू असते. महिलांना आता सभासद होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मंगळवारपासून सदस्यत्व नोंदणी विविध केंद्रांवर करण्यात येणार आहे. 

नागपूर - महिलांच्या हक्‍काचे व्यासपीठ असलेल्या "सकाळ-मधुरांगण'ने अगदी कमी वेळात महिलांच्या मनात जागा केली. मधुरांगणने गेल्यावर्षी विविध उपक्रम राबवून महिलांची मने जिंकली. त्यामुळे मधुरांगणचे सदस्यत्व मिळविण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ सुरू असते. महिलांना आता सभासद होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मंगळवारपासून सदस्यत्व नोंदणी विविध केंद्रांवर करण्यात येणार आहे. 

मधुरांगणचे सदस्यता शुल्क केवळ 599 रुपये असून, सभासदांना भरमसाट आकर्षक "गिफ्ट' दिले जाणार आहेत. यात साडेसातशे रुपये किमतीचा तीन पिसेसचा मेलमाईन जार सेट ट्रे आणि वर्षभरासाठी तनिष्का मासिकाचा समावेश आहे. तसेच हजारो रुपयांचे मोफत गिफ्ट व्हाउचर्स देण्यात येतील. महिलांनी अधिकाधिक संख्येने सदस्य होऊन विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा. मधुरांगणतर्फे सदस्यांना विविध कार्यक्रमांत व्यासपीठ मिळवून दिले जाते. वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते. पाककला, हस्तकला, चित्रकला यांसारख्या विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी, वेटलॉस शिबिर घेतली जातात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9130097511, 8888857377 किंवा 9527004456 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. 

आकर्षक "गिफ्ट' 
मधुरांगणच्या सदस्यांना "विष्णूजी की रसोई'कडून साडेतीनशे रुपयांचे डीनर व्हाउचर, फ्लोरा सलूनकडून साडेतीनशे रुपयांचे हेअरकट व्हाउचर, कार्तिका फोटो स्टुडिओकडून तीनशे रुपयांचे फोटोशूट व्हाउचर, ऍडव्हान्स डेंटल हॉस्पिटलकडून अडीचशे रुपयांचे डेंटल चेकअप व्हाउचर, ट्रिम्स सलूनकडून अडीचशे रुपयांचे हेअर वॉश व ब्लो ड्राय व्हाउचर, द्वारका वॉटर पार्ककडून दीडशे रुपयांचे लंच व्हाउचर, लोंदे ज्वेलर्सतर्फे पहिल्या एक हजार सभासदांना चांदीच्या कुड्या तसेच यमी पावभाजी सेंटरतर्फे शंभर रुपयांचे पावभाजी किंवा पुलाव व्हाउचर देण्यात येईल. 

सकाळ शहर कार्यालय : वर्धा हाउस, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, वेळ सकाळी 10 ते 6 

- पुरुषोत्तम सुपरबाजार : एनआयटी गार्डनजवळ, त्रिमूर्तीनगर, रिंग रोड, वेळ सायंकाळी 5 ते 9 पर्यंत. 

- रोकडे ज्वेलर्स : बडकस चौक, महाल, वेळ सायंकाळी 5 ते 9 पर्यंत 

- रक्षकबंधू सुपर बाजार : तुकडोजी चौक, मानेवाडा रोड, वेळ सायंकाळी 5 ते 9 पर्यंत 

Web Title: attractive gift for madhurangan member