स्वयंचलित हवामान केंद्र बेभरवशाचे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

वानाडोंगरी (जि.नागपूर ) : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत दोन वर्षांपूर्वी राज्यासह हिंगणा तालुक्‍यात लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांना विविध प्रकारची हवामानाशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारले. परंतु आजपर्यंत हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ही माहिती कधी मिळणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी मॉन्सूनची योग्य स्थिती, दुष्काळसदृश परिस्थिती हवामान आधारित पीकविमा व पावसाची माहिती या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मिळणार होती. महावेध कंपनीच्या माध्यमातून हे काम करण्यात आले.

वानाडोंगरी (जि.नागपूर ) : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत दोन वर्षांपूर्वी राज्यासह हिंगणा तालुक्‍यात लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांना विविध प्रकारची हवामानाशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारले. परंतु आजपर्यंत हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ही माहिती कधी मिळणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी मॉन्सूनची योग्य स्थिती, दुष्काळसदृश परिस्थिती हवामान आधारित पीकविमा व पावसाची माहिती या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मिळणार होती. महावेध कंपनीच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. स्वयंचलित हवामान केंद्र हा शासन व स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचा खासगी भागीदारी असलेला प्रकल्प आहे. हिंगणा तालुक्‍यातील एकूण सहा विभागातील सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे हवामानाशी संबंधित अचूक माहिती जीपीएसच्या माध्यमातून तहसील कार्यालयाला मिळणार होती. तसेच गावाची माहिती ग्रामपंचायतला मिळणार होती. नंतर ती माहिती एसएमएसद्वारे संबंधित केंद्रातील शेतकऱ्यांना मिळणार होती. परंतु हिंगणा तहसील कार्यालयात चौकशी केली असता याबाबत कुणालाच माहिती नाही. सुटीच्या दिवशी कुणीतरी कंपनीवाले आले आणि हे हवामानयंत्र लावून गेले. देशातील पहिल्या केंद्राचे उद्‌घाटन नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते. हिंगणा तहसील कार्यालयाच्या मागे हे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले. परंतु तहसील कार्यालयात याची नोंद नाही. 
मागील पाच वर्षांत शासनाने विविध योजनांच्या घोषणा केल्या. काही योजनांचे भूमिपूजन केले. परंतु कामे सुरू झाली नाही. दोन वर्षांत स्वयंचलित हवामान केंद्राचा एकही एसएमएस आला नाही. तसेच पावसाचा अंदाजसुद्धा मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांना पीकविमाही मिळाला नाही. 
दिलीप टेंभरे, शेतकरी, रायपूर (हिंगणा ) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Automatic weather station reliability