अवनीचा "सी-1' बछडा बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

यवतमाळ : टी-वन वाघिणीच्या सी-1 व सी-2 या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी 18 डिसेंबरपासून मोहीम सुरू आहे. त्यासाठी जवळपास 80 हेक्‍टर क्षेत्राला जाळी व कापडाचे कुंपण करण्यात आले आहे. मात्र, यातूनही सी-1 बछडा पळून गेल्याच्या चर्चेला उधाण आले. याबाबत विचारणा केली असता, शोधमोहीम सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

टी-वन (अवनी) वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली. 22 डिसेबरला मादी बछड्याला (सी-2) जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तर, नर बछडा (सी-1) जाळ्यात अडकला नाही. बछडे बाहेर जाऊ नयेत, यासाठी 80 हेक्‍टर क्षेत्रात चाळी आणि कापडाचे कुंपण करण्यात आले. त्यातील 20 एकर परिसरात बछडा असल्याचे दिसून आले. बछड्याने चार दिवसांपासून शिकार केली नसल्याने त्यासाठी जंगल भागात बकरी व मांस ठेवण्यात आले. बछड्यांच्या शोध घेण्यासाठी पायदळ मोहीम राबविण्यात आली. कॅमेऱ्यामध्येही बिछड्याचे लोकेशन दिसले नाही. त्यामुळे बछडा कुंपण पार करून बाहेर गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
जाळी तोडून पळ काढल्याची चर्चा
हत्तीवरून पाठलाग झाल्याने सी-1 बछडा परिसरातच लपून बसला होता. मागील चार दिवसांपासून त्याने काहीच खाल्ले नाही. त्यामुळे वनविभागाने बछड्याची शोधमोहीम थांबविण्यात आली. हा बछडा कॅमेऱ्यात आढळला नाही. पाणी पिण्याच्या ठिकाणी कोणतेही पगमार्क आढळले नाही. काल सायंकाळी याच परिसरात लावण्यात आलेली जाळी सी-1 बछड्याने तोडून तेथून पळ काढल्याने वनविभागासमोर नवीनच पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Avni "C-1" calf missing