कोरोनाविषयक जनजागृती एक अफलातून प्रयोग, अभिनेते राजकुमार यांच्या आवाजात

carona.
carona.

चंद्रपूर : कोरोना व्हायरसने जगाला हादरवून सोडले आहे. आपल्या देशातही याची खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी डॉक्‍टर, पोलिस, प्रशासन, संशोधक आपल्या जिवाचे रान करीत आहेत. सामाजिक दायित्व म्हणून समाजातील अनेक मंडळी जागरूकतेने काम करीत आहेत.
चंद्रपूरच्या एका कलावंताने अभिनेते राजकुमार यांच्या आवाजात कोरोनाबाबत जागृती करणारी एक व्हिडिओ क्‍लिप तयार केली असून ती चांगलीच चर्चेत आहे.
राजू खोब्रागडे हे चंद्रपूरचे रहिवासी असून ते चांगले कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत.
विविध अभिनेत्यांचा ते हुबेहुब आवाज काढतात. काही मराठी चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
सध्या कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाकडून लोकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन करूनही अनेकजण याची अंमलबजावणी करीत नाहीत.
कोरोना संशयित रूग्णाने उपचारानंतर घराबाहेर पडू नये याविषयी जनजागृती करण्यासाठी राजू खोब्रागडे यांनी मेरी जंग या चित्रपटातील राजकुमार व गोविंदा यांच्यामधील संवादाच्या आधाराने एक व्हिडीओ बनविला आहे. विशेष म्हणजे राजकुमार व गोविंदा या दोघांचाही हुबेहूब आवाज खोब्रागडे यांनी काढला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत चंद्रपूर पोलिसांचे कौतूकही करण्यात आले आहे.

कलेचा समाजासाठी उपयोग
कोरोनाला हरविण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे,आपण स्वत:ची व कुटुंबियाची काळजी घेऊन घराबाहेर न पडता ही जबाबदारी पार पाडू शकतो. मी कलावंत आहे. समाजासाठी आपली कला संदेशात्मक ठरावी यासाठी हा प्रयोग केला.
राजू खोब्रागडे,कलावंत चंद्रपूर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com